शासन निर्णय दि. 13/12/2018 अन्वये राज्यातील तृतीयपंथीय कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राज्यस्तर व विभागीय स्तरावर तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तृतीयपंथीयांच्या सर्वांगिण विकासासाठी मंत्रिमंडळाने दि. ११ मार्च, २०२४ च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील चर्चेनुसार आणि आवश्यक सुधारणांसह महाराष्ट्र राज्याचे तृतीयपंथीयांसाठीचे धोरण-२०२४ जाहिर करण्यात आले आहे.