सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
शासन निर्णय
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रं.इबीसी-1094/32038/ प्र.क्र.90/मावक-2, दि.12 जानेवारी,1996
योजनेचा उद्देश
इयत्ता 5 वी ते 7 वी व इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिकणा-या मागासवर्गीय मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्शाने अनुक्रमे सन 1996 व 2003 पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.
योजनेचे नाव : ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जाती
पात्रतेचे निकष
उत्पन्न व गुणांची अट नाही. विदयार्थ्यांना अर्ज करण्याची आवश्यकता नाही
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप
- इयत्ता 5 वी ते 7 वी दरमहा 60 रुपये (10 महिन्यासाठी 600 )
- इयत्ता 8 वी ते 10 वी दरमहा 100 रुपये (10 महिन्यासाठी 1000)
संपर्क कार्यालय
संबधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी ,जिल्हा परीषद
अर्जाचा नमुना या योजनेसाठी https://prematric.mahait.org/login/login या वेबसाईटवर शाळेच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा