बंद

    अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी असलेल्या शासकीय वसतिगृहाचे परिरक्षण (2225-3342)

    तारीख : 29/06/2025 -

    शासन निर्णय

    सामाजिक न्याय सांस्कृतीक कार्य व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. बीसीएच-2005./प्र.क्र.554/मावक-4, दिनांक 28 जून 2007, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. बीसीएच-2015/ प्र.क्र.411 / बांधकामे, दिनांक 16 डिसेंबर 2015, सामाजिक न्याय, सांस्कृतीक कार्य, क्रिडा व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. बीसीएच-2002/प्र.क्र.301/मावक4, दिनांक 17 जून 2003.

    योजनेचा उद्देश

    मागासवर्गीय मुलामुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे व त्याचप्रमाणे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलां-मुलींना विद्यालयीन – महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत तालुका व जिल्हा व विभागीयस्तरावर शासकीय वसतिगृहे सुरु करणे व त्यांचे परिरक्षण करणे.योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव
    अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास व इतर मागास प्रवर्ग, विशेष मागासवर्ग प्रवर्ग, अपंग, अनाथ

    पात्रतेचे निकष

    1. गुणवत्तेनुसार प्रवेश देता येतो.
    2. विदयार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
    3. प्रवेशित विदयार्थ्याच्या पालकाचे, वार्षिक उत्पन्न 2,50,000/- पेक्षा जास्त नसावे.
    4. इयत्ता 8 वी व त्यापुढे महाविदयालयीन शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्याना प्रवेशासाठी अर्ज करता येईल.
    5. अर्ज करावयाची मुदत शालेय विदयार्थ्यासाठी जुलै पूर्वी, महाविदयालयीन विदयार्थ्यासाठी जुलै ते ऑगस्ट पर्यत

    दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप़़

    • निवास- वसतीगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना कॉट, गादी, उशी, उशी कव्हर, बेडकव्हर, चादर, ब्लॅकेट इत्यादी पुरविण्यात येते.
    • भोजन-शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्याना दररोज दोन वेळा पोटभर जेवण देण्यात येते. जेवणामध्ये गहू/बाजरी/ज्वारी, तांदूळ (भात), दाळ, भाजीपाला, कंदभाजी इत्यादीचा समावेश करण्यात येतो.
    • नाश्ता- विद्यार्थ्यांना उसळ, पोहे, शिरा यापैकी एक पदार्थ, दूध (साखरेसह), उकडलेली अंडी दोन दररोज व शाकाहारी मुलांसाठी कॉर्नफ्लेक्स, एक सफरचंद व रूतूमानाप्रमाणे मिळणारे एक फळ दररोज देण्यात येते.
    • भोजनामध्ये आठवड्यातून दोनदा मटन/ चिकन 250 ग्रॅम आणि 250 ग्रॅम प्रमाणे भात/ पुलाव सलाडसह प्रतिविद्यार्थी प्रमाणे देण्यात येते. शाकाहारी विद्यार्थ्यासांठी दोन भाजी, वरण व दही, भात व एक गोड पदार्थ आठवड्यातून दोन वेळा देण्यात येतो. आहारामध्ये विद्यार्थ्यांना दर आठवड्याला 50 ग्रॅम तुपाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे जेवणात दररोज कांदा, लिंबू, लोणचे, पापड, सलाड इत्यादीचा समावेश करण्यात येतो.
    • निर्वाह भत्ता- वसतीगृहातील प्रत्येक विद्यार्थ्यांला मोफत निवास व भोजन याव्यतिरिक्त दर महिन्याला खर्चासाठी पुढीलप्रमाणे निर्वाह भत्ता दिला जातो.
    • विभागीय स्तरावरील वसतीगृहातील विद्यार्थी – रू.800/-.
    • जिल्हा स्तरावरील वसतीगृहातील विद्यार्थी -रू.600/-
    • तालुकास्तरावरील वसतीगृहातील विद्यार्थी -रू.500/-
    • मुलींना वरील प्रमाणे निर्वाह भत्त्याव्यतिरिक्त स्वच्छता प्रसाधनासाठी अतिरिक्त रु. 100/ .
    • गणवेश व शालेय साहित्य-
    • शालेय विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन जोड गणवेशासाठी दरवर्षी रू. 500/. ज्या महाविद्यालयांसाठी ड्रेसकोड असेल तेथे दोन जोड गणवेशासाठी रू. 1000/
    • वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ॲप्रनसाठी रू. 500/, वैद्यकीय साहित्यासाठी रू. 2000/- (स्टेथोस्कोपसाठी रू. 1000/- व इतर साहित्यासाठी रू. 1000/) दरवर्षी.
    • अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याना बॉयलरसूट साठी रू. 500/, ड्राईंगबोर्ड व इतर साहित्यासाठी रू.2500/ आणि लॅब एप्रनसाठी रू.500/
    • शारिरीक शिक्षण महाविद्यालयतील विद्यार्थ्यांना 2 गणवेशासाठी रू.4000/ दरवर्षी.
    • कला शाखेतील चित्रकला संगीत व इतर पदविका तसेच विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यासाठी आवश्यक साहित्यासाठी रू.4000/ दरवर्षी.
    • वसतीगृहातील सर्व प्रवेशित विद्यार्थ्याना छत्री/रेनकोट व गमबूट यासाठी दरवर्षी रू 500/.
    • शैक्षणिक सहलीसाठी रू.2000/ आणि कार्यशाळेसाठी रू.500/- त्याचप्रमाणे प्राजेक्ट रिपोर्टसाठी रू.1000/ प्रती प्रकल्प देण्यात येतात.
    • खेळ व करमणूक- प्रत्येक शासकीय वसतीगृहाला पुढील बाबींवर निधी देण्यात येतो.
    • विद्यार्थ्याचे स्नेहसंमेलन व इतर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रू.25000/ प्रत्येक वसतीगृहासाठी दरवर्षी (साऊड सिस्टीम साहित्य व इतर खर्चास)
    • क्रीडा वस्तू खरेदीसाठी प्रत्येक शासकीय वसतीगृह रू.10000/ दरवर्षी.
    • कलर टी.व्ही. (40 ते 50 इंच स्क्रीन) प्रत्येक वसतीगृहासाठी पुरविण्यात आलेले आहेत. त्याबरोबर वैज्ञानीक व संशोधनात्मक चॅनलकरीता डीश एन्टीना व पेड चॅनलकरीता रू.10000/ प्रतीवर्षी देण्यात येतात.

    अन्य सोयी सुविधा-

    • वसतीगृहातील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करण्यात येते.
    • वसतीगृहामध्ये फायर फायटींग सुविधा बसविण्यात येते.
    • 10 विद्यार्थ्यासाठी एक संगणक इंटरनेट सुविधेसह व एका वसतीगृहासाठी एक प्रिंटर.
    • इन्वर्हर्टर, सोलर उर्जेची सुविधा.
    • वसतीगृहात अद्ययावत व स्वतंत्र ग्रंथालय. त्यामध्ये एलसीडी, संगणक इंटरनेटसह आवश्यक सर्व फनिचर व इ लायब्रंरीच्या सर्व सुविधा. 5 वर्तमानपत्रे, इंग्रजी/म राठी, 10 शिक्षण उपयोगी मासिके. स्पर्धा परिक्षेसाठी रूपये 2.00 लाख प्रती वसतीगृह खर्च अनुज्ञेय आहे.
    • पालक सभेसाठी रू.10000/ प्रत्येक वसतीगृहाला.

    संपर्क कार्यालय

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा