अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती
निधी कोणाद्वारे प्राप्त होतो
महाराष्ट्र शासन
शासन निर्णय
सा. न्या. व वि. स. विभाग, शासन निर्णय : क्र. इबीसी-2017/प्र.क्र.288/शिक्षण-1, दि : 27/06/2017, दि.20.07.2023, दि.30.10.2023, दि.09.11.2023 व दि.25.07.2024
योजनेचा उद्देश
अनु. जातीच्या मुलामुलींना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशात नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्याची गुणवत्ता असुनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. अनु. जातीच्या मुलामुलींना परदेशात शिक्षणात संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा या उददेशाने सदर योजनेचे नाव : सुरु करण्यात आली.
पात्रतेचे निकष
- विद्यार्थी अनुसूचित जाती / नवबौध्द घटकातील असावा.
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे व पीएचडीसाठी 40 वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल.
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 8.00 लाखापेक्षा जास्त नसावे.
- परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दोन वर्षे कालावधीचाच एमबीए अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील.
- भारतीय आयुर्विज्ञान परीषदेच्या संकेतस्थळावरील एमडी व एमएस अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील.
- परदेशातील शिक्षण संस्था ही जागतीक क्रमवारीत (क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँक) 200 च्या आत असावी.
- पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परिक्षेत व पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परिक्षेत किमान 55% गुण असणे आवश्यक.
- एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता यईल त्यापेक्षा जास्त मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ लागू राहणार नाही.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप
- विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण फीची पूर्ण रक्कम तसेच विदयार्थ्यांस आवश्यक आरोग्य विमा (आरोग्य विमा) परदेश शिष्यवृत्तीधारकांसाठी अनुज्ञेय असतील.
- विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी यु. एस. डॉलर 15,400 तर यु.के.साठी जी.बी.पौंड 9,900 इतका अदा करण्यात येतो.पुस्तके व इतर आकस्मिक खर्च अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी यु. एस. डॉलर 1500 तर यु.के.साठी जी.बी.पौंड 1100 इतका अदा करण्यात येतो
- विद्यार्थ्यास परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येताना विमान प्रवासाचा खर्च अनुज्ञेय असेल.
संपर्क कार्यालय
आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, 3,चर्च रोड, पुणे-411 001.
संपर्क क्रमांक-020-26127569, 26137186 ई-मेल fs-sw-edu@gov.in
अर्जाचा नमुना अर्जाचा नमुना : या योजनेसाठी www.maharashtra.gov.in या शासनाच्या संकेतस्थळावरुन किंवा उपरोक्त पत्त्यावर अर्ज उपलब्ध होईल.
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा