बंद

    अनुसूचित जातीच्या मुला-मुलीसाठी मागासवर्गीय शैक्षणिक संस्थावरील सोयीसुविधा वाढविणे

    तारीख : 30/06/2025 -

    शासन निर्णय

    • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. बीसीएच-2010/प्रक्र. 430/मावक-4, दिनांक 26 जुलै 2011

    योजनेचा मुख्य उददेश

    • अनुसूचित जातीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता सोयी सुविधा पुरविणे.

    योजनेच्या प्रमूख अटी

    • सदर लाभार्थी हा शासकीय वसतीगृहात किवा शासकीय निवसी शाळेत प्रवेशित असावा.

    लाभाचे स्वरुप

    • मोफत निवास व भोजन, अंथरूण-पांघरूण, ग्रंथालयीन सुविधा, प्रत्येक वसतिगृहात ॲक्वागार्ड व वॉटरकूलर, गरम पाण्याची सुविधा.
    • 10 विद्यार्थ्यांमागे एक संगणक प्रिंटर व इंटरनेट सुविधेसह, वसतीगृहात फायर फायटिंग सुविधा, पेस्ट कंट्रोलची सुविधा इ.
    • शालेय विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी दोन गणवेश. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना नाईट ड्रेस
    • क्रमिक पाठय पुस्तके, वहया, स्टेशनरी इत्यादी. ग्रंथालयीन पुस्तके.
    • वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विथ्यार्थ्याना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, ॲप्रन,ड्रॉईग बोर्ड, बॉयलर सूट व कला निकेतनच्या विद्यार्थ्यासाठी रंग, ड्रॉईग बोर्ड, ब्रश, कॅनव्हास इत्यादी.
    • मुलींना स्वच्छता प्रसाधनासाठी अतिरिक्त रू. 100 दरमहा
    • वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी निर्वाहभता दरमहा खालीलप्रमाणे
      विभागीय पातळीवर – रू. 800/-
      जिल्हा पातळीवर – रू. 600/-
      तालुका पातळीवर- रु. 500/-

    संपर्क कार्यालय

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा