इयत्ता 9 वी व 10 वी मधील अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती
केंद्र हिस्सा (६०%) व राज्य हिस्सा (४०%)
शासन निर्णय
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रं. इबीसी-1094/32038/ प्र.क्र.151/शिक्षण-1, दि. 04 ऑक्टोबर, 2013
योजनेचा मुख्य उददेश
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.इबीसी 2012/प्र.क्र.151/शिक्षण-1 दि.4 ऑक्टोबर 2013 नुसार सन 2013-14 या शैक्षणिक वर्षापासून सदर योजना लागू करण्यास मान्यता दिलेली आहे.अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने केंद्र शासनाने सदर योजना सुरू केली आहे.
योजनेच्या प्रमूख अटी
- सदर योजना शासकिय मान्यता प्राप्त शाळेत शिकत असणा-या विद्यार्थ्यांस लागू
- सदर योजने अंतर्गत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा रु.2.00 लक्ष
- यामध्ये विद्यार्थ्यांच्या किमान गुणांची अट नाही.
- सदर योजने अंतर्गत विद्यार्थ्याने अर्ज करणे आवश्यक आहे.
- सदर योजनेचा लाभ केंद्राच्या इतर माध्यमिक पूर्व शिष्यवृत्तीच्या लाभार्थ्यांना लागू राहणार नाही
- या योजनेकरीता राज्य स्तरावर सह आयुक्त (शिक्षण), समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांना आणि जिल्हा स्तरावर जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद व समाज कल्याण अधिकारी, वर्ग-2 बृहमुंबई तक्रार निवारण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
- राज्य शासनाची सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ही योजना अनुसूचित जाती प्रवर्गातील इयत्ता 8 वी ते 10 वी च्या सर्व मुलींसाठी सध्या सुरु आहे. यामध्ये पालांच्या उत्पन्नाची मर्यादा नाही. मात्र केंद्र शासनाच्या इयत्ता 9 वी व 10 वी मध्ये शिकत असणा-या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेमध्ये रुपये 2.00 लक्ष इतके वार्षिक उत्पन्न असणा-या पालकांच्या इयत्ता 9 वी व 10 वी च्या मुलींचा समावेश होणार आहे. त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील इयत्ता 8 वी च्या मुली आणि रुपये 2.00 लक्ष पेक्षा जास्त उत्पन्न असणा-या पालकांच्या इयत्ता 9 वी व 10 वी च्या मूलींकरिता सध्याची सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना यापुढेही चालू राहिल. मात्र एकाच लाभार्थ्यांस दोन्ही योजनेचा लाभ घेता येणार नाही.
लाभाचे स्वरुप
| अ. क्र. | योजना | वसतीगृहात न राहणारे (अनिवासी) | एकूण 10 महिन्यांसाठी | वसतीगृहात राहणारे (निवासी) | एकूण 10 महिन्यांसाठी |
|---|---|---|---|---|---|
| 1 | शिष्यवृत्तीच दर (प्रतिमाह) | ₹. 150 | 1500 | ₹.350 | ₹. 3500 |
| 2 | पुस्तके व तत्सम अनुदान (वार्षिक) | ₹. 750 | 7500 | ₹.1000 | ₹. 10000 |
| अ.क्र. | भत्त्याचा प्रकार | मासिक भत्याची रक्कम |
|---|---|---|
| 1 | अंध विद्यार्थ्यांसाठी वाचक भत्ता | ₹.160/- |
| 2 | वसतीगृहात न राहणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांसाठी वाहतूक भत्ता | ₹.160/- |
| 3 | अपंग विद्यार्थ्यांच्या सोबत असलेले भत्ता | ₹.160/- |
| 4 | अपंग विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मदतनिस भत्ता | ₹.160/- |
| 5 | मंदबुद्धी विद्यार्थ्यांसाठी शिकवणी भत्ता | ₹.240/- |
संपर्क
संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा