बंद

    डॉ.आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना

    • तारीख : 30/06/2025 -

    केंद्र पुरस्कृत (100% केंद्र)

    शासन निर्णय

    • डॉ.आंबेडकर फौंडेशन, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.34-1/2013/ डीएएफ, दि. 27/4/2014
    • डॉ.आंबेडकर फौंडेशन, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.34-1/2013/ डीएएफ, दि.16/10/2017
    • डॉ.आंबेडकर फौंडेशन, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.34-1/2013/डीएएफ, दि.5/1/2018

    योजनेचा मुख्य उद्देश

    • समाजातील जातीव्यवस्था नष्ट होवून सामाजिक समता प्रस्थापित होणेकरिता अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला गती
    • मिळण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना अर्थसहाय्य देणे

    योजनेच्या प्रमुख अटी

    • लाभार्थी हा महाराष्ट्रातील कायमस्वरुपी रहिवाशी असावा.
    • लाभार्थी, विवाहीत जोडप्या पैकी एक व्यक्ती ही अनु.जाती व दुसरी इतर प्रवर्गातील असावी.
    • विवाह 1998 प्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या विवाह कायद्यांतर्गत नोंदणीकृत असावा.
    • जिल्हाधिकारी यांनी प्रमाणित केलेले विहीत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
    • विवाह समयी वराचे वय 21 वर्षे व वधूचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
    • आमदार किंवा खासदार यांचे शिफारस
    • राज्य शासनाच्या आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेतला आहे किंवा नाही याबाबतची माहिती.

    लाभाचे स्वरुप

    • रु.2.50 लाख प्रती दाम्पत्य (जोडपे)

    टिप

    • सदर योजनेंतर्गत मंजूर निधी केंद्र शासनाकडून थेट लाभार्थ्यांना उपलब्ध करुन दिला जातो.
    • प्रतीवर्षी महाराष्ट्र राज्यातील एकूण 33 जोडप्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.

    संपर्क

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा