बंद

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक स्थळांचा विकास करणे

    तारीख : 27/06/2025 -

    राज्य पुरस्कृत योजना

    शासन निर्णय

    • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन निर्णय क्र. सान्यावि-2015/ प्र.क्र.163/बांधकामे,
      दि.9 ऑक्टोबर, 2015
    • शासन निणय दिनांक 24 मार्च, 2017
    • शासन निर्णय दिनांक 12 ऑक्टोबर, 2017
    • शासन निर्णय दिनांक 14 मार्च, 2018

    योजनेचा मुख्य उद्देश

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनाशी निगडीत असलेली घटनास्थळ व महत्वाच्या ऐतिहासिक स्थळांना पर्यटनाचा दर्जा देऊन या स्थळांचा विकास करणे.

    योजनेच्या प्रमुख अटी

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनाशी निगडीत ऐतिहासिक स्थळ असणे आवश्यक आहे.

    लाभाचे स्वरुप

    निवड केलेल्या वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा, मलनिस्सारण, जोडरस्ते, अंतर्गतरस्ते, गटार बांधणे, वीजपुरवठा, विद्युत पथदिवे/सोलार दिवे, सार्वजनिक विहिर खोदाई व दुरुस्ती, समाजमंदिर बांधकाम, जुन्या समाजमंदिराची दुरुस्ती व पुर्नबांधणी, वाचनालय, संगणक केंद्र, व्यवसाय प्रशिक्षण शाळा, व्यायामशाळा, छोटे सुसज्ज सभागृह, महिला बचत गट प्रशिक्षण वर्ग, आरोग्य शिबिरे, व्यसनमुक्ती व अंधश्रध्दा निर्मुलन प्रचार व प्रसार कार्यशाळा व कौशल्य विकासावर आधारीत प्रशिक्षण कार्यक्रम, युवकांसाठी नेतृत्व शिबीर व कौशल्य विकास प्रशिक्षण, अंगणवाडी, बालवाडीच्या सुविधा, स्मशानभूमीमध्ये अद्यायावत सोयी-सुविधा, प्रत्येक घराला विज कनेक्शन, पाणी, नळ जोडणी, गॅस कनेक्शन, वैयक्तीक स्वच्छतागृहे, वैयक्तीक स्वच्छतागृहासाठी जागा उपलब्ध नसल्यास सार्वजनिक स्वच्छतागृहे इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध करणे – (मंजूर कामासाठी 100 टक्के अनुदान)

    संपर्क

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा