बंद

    नशामुक्त भारत अभियान

    • तारीख : 30/06/2025 -

    शासन निर्णय

    भारत सरकार सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय विभाग शास्त्री भवन, नवी दिल्ली यांच्याकडील पत्र क्र. 12-1/2020-DP-ll दि.13/07/2020 अन्वये मादक पदार्थांच्या गैरवापराच्या प्रतिबंध करण्याकरिता आणि भारताला अंमली पदार्थ मुक्त बनविण्याच्या दृष्टीकोनातून, नशामुक्त भारत अभियान (एनएमबीए) दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी सुरुवात करण्यात आलेली आहे.

    योजनेचा उद्देश

    सर्वसमावेशक राष्ट्रीय सर्वेक्षणातील निष्कर्ष व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो द्वारे प्रदान केलेल्या माहितीच्या आधारे देशातील अंमली पदार्थ वापराच्या दृष्टीने सर्वात असुरक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 272 जिल्ह्यांमध्ये नशामुक्त भारत अभियान सुरू करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण दहा जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे (नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई जळगाव, अहमदनगर, गडचिरोली, ठाणे, सोलापूर व कोल्हापूर).

    लाभाचे स्वरूप

    • केंद्र शासनाकडून नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत निवडलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यास रक्कम रुपये 10 लाख अनुदान म्हणून दिले जाईल.

    संपर्क कार्यालय

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा