बंद

    बाबु जगजीवनराम छात्रावास योजना

    तारीख : 30/06/2025 -

    योजनेचा मुख्य उदेदश

    • अनुसूचित जातीच्या मुला-मुलींच्या विदयार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कॉलेज व विदयापीठामध्ये निवास व्यवस्था पुरवणे.
    • राज्य सरकार/केंद्र शासित प्रदेश आणि केंद्र व राज्य विदयापीठ / संस्था या विस्तारित बांधकाम व इमारत नुतनीकरण दुरुस्तीकरिता अर्थसहाय्यासाठी पात्र आहेत. आणि खाजगी क्षेत्रातील अभिमत विदयापीठांना विस्तारित बांधकामासाठी या योजनेचा लाभ देय ठरतो.

    योजनेच्या प्रमूख अटी

    • संस्था सामाजिक न्याय विभागांतर्गत अथवा केंद्रीय विदयापीठअंतर्गतचे विदयापीठ यापैकी कार्यरत असावे, संस्थेने बांधकाम अनुदानासाठी स्वतंत्ररित्या अर्ज केला असावा.
    • संस्थेने बांधकामाचे निश्चित स्वरुपाचे वेळापत्रक सादर करून बांधकाम केंद्रीय अनुदान मिळाल्यापासून ५ वर्षाच्या आत करणे आवश्यक आहे.
    • संस्थेमध्ये १०० प्रवेशितांपेक्षा जास्त प्रवेशितांसाठी अनुदान मिळणार नाही. १०० विदयार्थ्यांपैकी १० टक्के बिगर अनुसुचित जातीचे विदयार्थी असणे आवश्यक आहे

    लाभाचे स्वरुप

    • मुलांच्या वसतीगृहासाठी 50:50% ( केंद्र शासन : राज्य शासन : स्वयंसेवी संस्था)
    • मुलींच्या वसतीगृहासाठी 100 % ( केंद्र शासन : स्वयंसेवी संस्था)

    संपर्क

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण 

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा