बंद

    राज्यातील 100 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देशांतील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण देण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना

    तारीख : 27/06/2025 -

    शासन निर्णय

    सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक- इबीसी-2017/ प्र.क्र.402/शिक्षण-1, दि.08 नोव्हेंबर,2017

    योजनेचा उद्देश

    एकविसाव्या शतकामध्ये यशस्वी होण्यास अनु. जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे कौशल्य व ज्ञान उपलब्ध व्हावे व त्यांची स्पर्धात्मक युगामध्ये जडणघडण व्हावी याकरीता देशातील उत्तमोत्तम शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या अनु. जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

    योजनेच्या प्रमुख अटी

    1. विद्यार्थी अनुसूचित व नवबौध्द जातीचा असावा. व सदर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
    2. कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. 6.00 लाख पर्यंत असावे.
    3. विद्यार्थी या योजनेसाठी शासन निर्णय दि. 8 नोव्हेंबर, 2017 सोबत जोडलेल्या शासन परिशिष्ट ब अन्वये
      महाराष्ट्र शासनाने मान्य केलेल्या संस्थेत प्रवेशित असावा. (उदा. आयआयएम, आयआयटी, एनआयटी, आयआयएसईआर, आयआयआयटी, आयआयआयएम)

    4. सदर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी इ.10 वी 12 वी ची परिक्षा मंडळ महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्ड / केंद्रीय
    5. बोर्ड(सीबीएसई) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक परिक्षांमध्ये किमान 55 % गुण मिळवून उत्तीर्ण
      झालेले असावे.

    दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप

    संस्थेने आकारणी केलेले शैक्षणिक शुल्क, वसतिगृह व भोजन शुल्क. क्रमिक पुस्तके – रु 5,000/- व शैक्षणिक साहित्य रु. 5,000/- असे एकूण प्रतिवर्षी रु. 10,000/-

    अर्ज करण्याची पध्दत

    विहित नमुन्यातील अर्ज भरणे (मॅन्युअली)

    संपर्क कार्यालयाचे नांव

    आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा