बंद

    व्यसनमुक्ती उपक्रमांसाठी वार्षिक नियोजित कार्यक्रम

    • तारीख : 30/06/2025 -

    योजनेचा उद्देश

    महाराष्ट्राच्या व्यसनमुक्ती धोरणाच्या अनुषंगाने समाज कल्याण आयुक्तालयाच्या अधिनस्त जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, यांचे मार्फत व्यसनमुक्ती प्रचार व प्रसिध्दी करण्याच्या अनुषंगाने दरवर्षी समयबध्द कार्यक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रम व दिन साजरे करणे.

    व्यसनमुक्ती प्रचार व प्रसिध्दी करण्याच्या अनुषंगाने दरवर्षी समयबध्द कार्यक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रम व दिन साजरे करणे.
    अ.क्र महिना दिनांक कालावधी कार्यक्रम कार्यक्रमाचे स्वरूप
    1 मे, 31 मे, जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन

    या दिवसाचे स्वरूप जागतिक आहे. सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन प्रामुख्याने जिल्हास्तरावर असलेल्या शासकीय संस्था स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने करुन घ्यावे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या सहकार्याने जि.प. आरोग्य विभाग यांनी सहभाग घेऊन घ्यावा. चित्र प्रदर्शन, चर्चासत्राचे आयोजन करावे,तत्पूर्वी योग्य मार्गदर्शन ठेवावे, जास्तीत जास्त क्लांतावस्थेत सहकार्याने व्यसनमुक्ती प्रचार कार्यासाठी जनजागृती करावी.

    2 जून, 26 जून, आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन

    या दिवसाचे स्वरूप आंतरराष्ट्रीय आहे. प्रामुख्याने विद्यालये, महिला मंडळे, युवक मंडळे, स्थानिक स्वयंसेवी संस्था, अनुदानित संस्था, महाविद्यालये, माध्यमिक विद्यालये, प्राथमिक विद्यालये, अन्य संस्था, आय.सी.डी.एस. शाखा, जिल्हा परिषदेचे प्रमुख, लोकशाही पद्धतीने निवडून आलेले कार्यकर्ते यांच्या सहकार्याने एक जन जागृती प्रभात फेरी आयोजित करावी.

    3 ऑक्टोबर दिनांक 2 ते 8 ऑक्टोबर, 70 वा व्यसनमुक्ती (दारूबंदी सप्ताह) तथा अमली पदार्थ सेवन विरोधी सप्ताह

    राष्ट्रपिता महात्मा गांधी व कै. लाल बहादूर शास्त्री यांचा जयंती प्रयत्न जिल्ह्यातील पंचायत समिती, ग्रामपंचायत, महिला मंडळे, युवक मंडळे, झोपडपट्टी व आदिवासी विभागांमध्ये कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्था, लोक कलाकार, युवक , महिला मंडळे, नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना, केंद्रिय अनुदान प्राप्त व्यसनमुक्ती केंद्र यांच्या कार्याच्या सहकार्याने घेण्यात यावे.जिल्ह्यात व्यसनमुक्ती सप्ताह आणि अमली पदार्थ सेवन विरोधी जनजागृती मोहीम भव्य प्रमाणावर आयोजित करावी. या सप्ताहात विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करावे. उदा. रॅलीस्पर्धा, चित्र प्रदर्शन, सभा, चर्चासत्रे, मेळावे आदी कार्यक्रम प्रभावी व परिणामकारक राहतील ह्यासाठी जन जागृती पूर्वक प्रयत्न करावा.

    4 ऑक्टोबर 2 ऑक्टोबर, उद्घाटन

    व्यसनमुक्ती सप्ताहाचे उद्घाटनाचा कार्यक्रम जिल्हास्तरावर महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीस पुण्यस्मरण अर्पण करून सार्वजनिक ठिकाणी जनजागृती सभा होईल , तेथे आयोजन करावे. या कार्यक्रमास मान्यवर. मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद प्रतिनिीधी, पंचायत समितीचे पदाधिकारी, जिल्हा स्तरावरील अधिकारी, आरोग्य विभाग इतर महत्वाच्या शासकीय विभागाचे कर्मचारी , राष्ट्रीय सेवा योजना , महाविद्यालयीन विद्यार्थी , शालेय विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर संस्था, महिला संस्था, युवक संस्था, आदींचा सहभाग असावा.उद्घाटक म्हणून जिल्हास्तरीय ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक , यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करावे. अध्यक्ष म्हणून मा. पालकमंत्री किव्हा मा. जिल्हाधिकारी यांना करावे. जिल्हा माहिती कार्यालय अधिकारी, जिल्हा परिषद , जिल्हा कार्यक्रम प्रमुख यांना आवश्यकता असल्यास तत्पूर्वी मार्गदर्शन ठेवावे.

    5 ऑक्टोबर 3 ऑक्टोबर, महिला मेळावा

    जिल्ह्यातील महिला मंडळांना या मेळाव्यात सहभागी करुन घ्यावे व मेळाव्यात जास्तीत जास्त महिला सहभाग घेऊन घ्याव्यात. डॉक्टर, वकील यांना पाचारण करून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे.

    6 ऑक्टोबर 4 ऑक्टोबर, युवक मेळावा

    सदर मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमधील प्रत्येक महाविद्यालयातून किमान 5 राष्ट्रीय सेवा योजनांचे विद्यार्थी, युवक मंडळे, नेहरू युवा केंद्रातील युवक मंडळे यांचा सहभाग करुन घ्यावा. या प्रसंगी तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे या मेळाव्यात जास्तीत जास्त युवक वर्ग सहभाग होईल याचा प्रयत्न करावा.

    7 ऑक्टोबर 5 ऑक्टोबर, कामगार मेळावा व कार्यशाळा

    सदर मेळाव्यास औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन करावे. जास्तीत जास्त कामगारांचा सहभाग होईल याचा प्रयत्न करावा. मेळाव्यासाठी कामगार, नगर पालिका कामगार, रेल्वे कर्मचारी, औद्योगिक कामगार क्षेत्रातील सहभाग असावा. तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शनासाठी पाचारण करावे.

    8 6 ऑक्टोबर, ऑक्टोबर युवकांची कार्यशाळा

    सदर कार्यशाळेत राष्ट्रीय सेवा योजनांचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनांचे कार्यक्रम अधिकारी, कामगार युवक आदींचा सहभाग करून घ्यावा कार्यशाळा मार्गदर्शक म्हणून व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणारे तज्ञ वक्ते-संस्थेचे पाचारण करावे.

    9 7 ऑक्टोबर, ऑक्टोबर चर्चासत्रे

    सदरील चर्चासत्रात राष्ट्रीस सेवा योजना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा , सामाजिक कार्य महाविद्यालये विद्यार्थी, महिला, युवक कामगार, आदींना सहभागी करुन घ्यावे. चर्चासत्रात व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते , प्राध्यापक, डॉक्टर, वकील तसेच व्यसनमुक्ती क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना पाचारण करावे.

    10 8 ऑक्टोबर, ऑक्टोबर सप्ताहाची सांगता

    व्यसनमुक्ती सप्ताहाची सांगता करतांना व्यसनमुक्तीशी संपूर्ण सप्ताहात सहभाग घेतलेल्या व्यक्ती, कलाकार, पत्रकार, लोकप्रतिनिधी यांना पाचारण करून त्यांचा यथोचित सन्मान करावा. विद्यार्थ्यांना वाटप अध्यक्षा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमाणपत्र प्रदान करावे. व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींचे अनुभव कथन करावे. स्थानिक कलाकारांकडून व्यसनमुक्तीवर यशोगाथा हा कार्यक्रम आयोजित करावा.

    11 जानेवारी 12 जानेवारी, ते 14 जानेवारी, युवा सप्ताह

    सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हास्तरावर प्रामुख्याने महाविद्यालये , कनिष्ठ महाविद्यालये, माध्यमिक, प्राथमिक विद्यालये यांचा सहभाग असावा, व्यसनमुक्तीचा संदेश घरोघर पोहचविण्याचे दृष्टीने जिल्हास्तरावर संदेशयात्रा जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आयोजित करावी. चित्रप्रदर्शन आणि चर्चासत्राचे महाविद्यालयात आयोजन करावे, विविध ठिकाणी कलावंतांचा आणि पथनाटयांचे कार्यक्रम आयोजित करावेत, नेहरु युवा केंद्राच्या सहकार्याने तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन ठेवावे.

    संपर्क कार्यालय

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा